🕒 1 min read
बंगळूरू: १९ वर्षीय एन तिलक वर्मा याच्यासाठी २०२२ वर्ष अत्यंत खास ठरले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद राज्याकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या खेळाडूने तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक शैलीत फलंदाजी करताना जबरदस्त खेळ दाखवला होता. तो त्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. यावर्षी आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात (Tilak Verma was bought by Mumbai Indians for 1 crore 70 lakhs) मुंबई इंडियन्सने त्याला १ कोटी ७० लाखांत खरेदी केले आहे.
त्याच्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि सीएसके यांच्यात चांगलीच चुरस दिसली. मात्र मुंबईने यात बाजी मारली. तिलक वर्मची बेस प्राईस २० लाख असताना त्याला मुंबईने १ कोटी ७० लाखांत खरेदी केले आहे.
दरम्यान आजच्या मेगा ऑक्शनमध्ये गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला शिवम दुबे (Shivam Dubey)यंदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याची बेस प्राईस ५० लाख असताना त्याला सिएसकेने ४ कोटींत खरेदी केले. त्याला खरेदी करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरस दिसली. मात्र चेन्नईने बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या:
- गेल्या ५ वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिप्पट श्रीमंत; संपत्तीत इतक्या कोटीने वाढ
- IPL Auction 2022 : शिवम दुबेची डबल लॉटरी; चेन्नईत मिळाली जागा अन्…
- IPL AUCTION 2022: चेतन साकारिया ४.२ कोटीत दिल्ली कॅपिटल्समध्ये
- पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांचे टीकास्त्र; म्हणाले,‘जोशीबुवांचं काम कधीपासून…’
- ‘बच्चू कडू यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा’; भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
