अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना चांदुरबाजार न्यायालयाने (Chandurbajar) निवडणूक लढते वेळी प्रतिज्ञापत्रात मुंबई मधील फ्लॅटची माहिती लपवल्याने २ महिने सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केली आहे.
न्यायालयाने दोषी ठरवल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचा राज्यमंत्रीपदाचा (State Minister) राजीनामा घ्यावा तसेच बच्चू कडू यांचे विधानसभा सदस्य पद रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ, अशी माहिती याचीकाकर्ते भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे, तसेच न्यायालयाने दोषी ठरवलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) राजीनामा घ्यावा अशी मागणी याचिका कर्ते गोपाल तिरमारे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL auction 2022 : वेस्ट इंडीजचा ओडीन पंहिल्यांदाच आयपीएल ऑक्शन मध्ये उतरला आणि थेट कोटीच्या घरात गेला
- ‘नोटीसा काढणारेच नंतर तुरुंगात जातात’; किरीट सोमय्यांचा टोला
- “हिंदुस्थानी भाऊला आपणच मोठं करतो’, उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य
- IPL AUCTION 2022: राजस्थान सोडत जयदेव मुंबईत ‘आला रे’
- ‘हातपाय तोडले तरी लढत राहणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

