बंगळूरू: गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला शिवम दुबे (Shivam Dubey) यंदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याची बेस प्राईस ५० लाख असताना त्याला सिएसकेने ४ कोटींत खरेदी केले. त्याला खरेदी करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरस दिसली. मात्र चेन्नईने बाजी मारली.
दरम्यान आजच शिवम दुबेला डबल लॉटरी लागली आहे. चेन्नईचा भाग बनल्यानंतर आजच त्याला पुत्ररत्न लाभले आहे. याबबत त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. त्याच्यासाठी ही डबल लॉटरीच म्हटली जात आहे.
अष्टपैलू शिवम दुबेने गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत लग्न केले होते. दोघांनी एका खाजगी समारंभात लग्न केले होते. दरम्यान शिवम दुबेने भारतीय संघाकडून वनडे आणि टी-२० मध्ये पदार्पण केले आहे. त्याने टीम इंडियासाठी १ वनडे आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘बच्चू कडू यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा’; भाजपची मागणी
- इलेक्ट्रिक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले
- IPL auction 2022 : वेस्ट इंडीजचा ओडीन पहिल्यांदाच आयपीएल ऑक्शन मध्ये उतरला आणि थेट कोटीच्या घरात गेला
- IPL AUCTION 2022: राजस्थान सोडत जयदेव मुंबईत ‘आला रे’
- ‘नोटीसा काढणारेच नंतर तुरुंगात जातात’; किरीट सोमय्यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

