Share

गेल्या ५ वर्षात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तिप्पट श्रीमंत; संपत्तीत इतक्या कोटीने वाढ

Published On: 

पणजी : देशात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरु झाला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशातील ५ राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात विधानसभेसाठी निवडणूका होणार आहेत, तर या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. जस जश्या विधानसभेसाठी निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत, तस तश्या नेत्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात एकूण किती वाढ झाली आहे याचे आकडेवारी पण आता समोर येऊ लागली आहे.

नुकत्याच बाहेर आलेल्या माहितीनुसार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद. सावंत यांच्या एकूण संपत्तीत गेल्या पाच वर्षात ६.८५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms-ADR ) या एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.  असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या एनजीओ गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यातील नेत्यांच्या संपत्ती बाबत सर्वेक्षण केले आहे, यात डॉ.प्रमोद. सावंत यांच्या संपत्तीत एकूण ६.८५ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोवा राज्यातील सगळ्या आमदारांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले कि, गोवा राज्यातील आमदारांच्या एकूण संपत्तीत सरासरी ६५ टक्के वाढ झाली आहे, तर उत्तराखंड राज्याच्या आमदारांच्या संपत्तीत एकूण सरासरी ४९ टक्क्याने वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!