Share

पाटलांच्या वक्तव्यावर भुजबळांचे टीकास्त्र; म्हणाले,‘जोशीबुवांचं काम कधीपासून…’

Published On: 

पुणे : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. कारण ठाकरे सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केले होते. दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली असून तुम्ही पाटील आहात, मग जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात?, असा खोचक सवालही भुजबळांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की,‘तुम्ही पाटील आहात, मग जोशीबुवांचं काम कधीपासून करायला लागलात?राज्यामधीलच नाही तर देशातील अनेक ठिकाणची सरकारं पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत.’ तसेच गोव्यात उद्या मतदान होत असून तेथे भाजप सोडून सर्वच सत्तेवर येतील, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, पाटलांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून चंद्रकांत पाटील यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. आता १० मार्च नंतर पाच राज्यांच्या निवडणुका येतील मग ते सरकार पडेल. या अगोदर पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या. मात्र काही झाले नाही. त्यांचे प्रयत्न त्यांनी विविध माध्यमातून सुरु ठेवावे. ईडी , सीबीआय अशा माध्यमांतून त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवावेत, असे राऊत म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!