मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतरही त्याच्या फलंदाजीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आयपीएलच्या १५व्या मोसमात विराट कोहलीला एकही मोठी इनिंग खेळता आलेली नाही. गेल्या सामन्यात तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १२ धावा करून धावबाद झाला होता. या कामगिरीनंतर वसीम जाफरने विराटवर मोठे वक्तव्य केले आहे.
विराटच्या (Virat kohli) फॉर्मवर प्रतिक्रिया देत वसीम जाफर (Wasim jaffer) म्हणाला, “विराट कोहलीने काही काळ ब्रेक घ्यावा आणि कॉमेंट्री करावी. यानंतर विराट धावांचा पाऊस पाडेल.” जाफरने हे केवळ विनोद म्हणून सांगितले आहे. वसीमने दिनेश कार्तिकचे उदाहरण देत कोहलीला हा सल्ला दिला आहे. कारण जेव्हा दिनेश कार्तिक खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर त्यानेकॉमेंट्री केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये परतला आणि तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.
विराट कोहलीला या मोसमात २३. ८० च्या सरासरीने केवळ ११९ धावा करता आल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटने आतापर्यंत एकही अर्धशतकी खेळी दिसलेली नाही. विराट या हंगामात तो दोनदा धावबाद झाला आहे. यावरून त्याचे चाहते खूप निराश झालेले दिसत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : दिनेश कार्तिक करणार टीम इंडियात कमबॅक? विराटनं दिलं ‘असं’ उत्तर; पाहा VIDEO!
- IPL 2022: नवख्या गुजरात पुढे आज अनुभवी चेन्नईचे आव्हान!
- IPL 2022 CSK vs GT : मॅचपूर्वी महेंद्रसिंह धोनी बनला ‘स्पिनर’; VIDEO होतोय व्हायरल!
- “राज ठाकरे हे दंगली भडविण्याचे काम…”; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका
- महसूलमंत्री असताना झालेल्या व्यवहाराची चौकशी होणार, नारायण राणेंच्या अडचणीत वाढ!


