मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (dinesh karthik) दमदार कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) कार्तिकचे कौतुक केले आहे. विराटने सांगितले, की कार्तिकने राष्ट्रीय संघात परतण्याचा जोरदार दावा केला आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा भाग व्हायचे असल्याचेही कार्तिकने सांगितले.
बंगळुरूसाठी फिनिशरची भूमिका बजावत असलेल्या दिनेश कार्तिकने २०९.५७च्या स्ट्राइक रेटने १९७ धावा केल्या आहेत. सहा डावांत तो एकदाच बाद झाला आहे. त्याने शनिवारी ३४ चेंडूत नाबाद ६६ धावांची खेळी केली. त्याच्यामुळे आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा १६ धावांनी पराभव केला.
कार्तिकशी झालेल्या संभाषणात कोहली म्हणाला, ”कार्तिकला स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना पाहणे ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. या मोसमात मी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूसोबत आहे, माझ्यासाठी हे शानदार आहे. तुला पुन्हा फलंदाजी करताना पाहणे हा सन्मान आहे. आम्हाला जिंकण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद.”
“The ultimate goal is to win games for India”: @DineshKarthik tells @imVkohli ????????
Special: @28anand gets DK and VK in one frame post #RCB's win against #DC????????
Full interview ???? ???? #TATAIPL | #DCvRCB https://t.co/8IHrM2SbN0 pic.twitter.com/UiOZsBZQ31
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
”दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळा़डू एबी डिव्हिलियर्स, ज्याने दीर्घकाळ संघात अशी भूमिका बजावली आहे, त्यालाही कार्तिकचा अभिमान वाटेल. मला खूप आनंद आहे की डीके (कार्तिक) त्याच्या लक्ष्याबद्दल स्पष्ट आहे. मी निश्चितपणे सांगू शकतो, की टी-२० क्रिकेटमध्ये फक्त आरसीबीच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तुझ्यामुळे अनेक लोक प्रभावित होतील. तू राष्ट्रीय संघासाठी जोरदार दावा केला आहे”, असेही विराटने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

