Share

IPL 2022 CSK vs GT : मॅचपूर्वी महेंद्रसिंह धोनी बनला ‘स्पिनर’; VIDEO होतोय व्हायरल!

Published On: 

मुंबई : आज आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) गुजरात टायटन्स (GT) संघाशी टक्कर घेणार आहे. या सामन्यापूर्वी (CSK vs GT) चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni ) नेट्समध्ये सराव करताना दिसून आला. यावेळी तो फलंदाज म्हणून नव्हे, तर एक फिरकीपटू म्हणून समोर आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून धोनीच्या गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये धोनी नेट्समध्ये लेग स्पिन करताना दिसत आहे. धोनीला स्पिनर होताना पाहून चाहत्यांनी विविधल प्रतिक्रिया दिल्या. आयपीएल २०२२ मध्ये सध्या गुजरातचा संघ गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे, तर कर्णधार चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे.

https://www.instagram.com/p/CcalW2klWPF/

गेल्या मोसमातील चॅम्पियन चेन्नई संघ यंदाच्या मोसमात वाईट टप्प्यातून जात आहे. संघाला अपेक्षेप्रमाणे स्पर्धेची सुरुवात करता आली नाही. दीपक चहरच्या रूपाने सीएसकेला आधीच मोठा धक्का बसला आहे, तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजीतही संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. सीएसकेने आतापर्यंत ५ सामन्यांपैकी फक्त एकच विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!