Share

“राज ठाकरे हे दंगली भडकवण्याचे काम…”; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

Published On: 

अकोला : आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेतली. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून हा सामाजिक विषय आहे, भोंग्यांचा त्रास हा हिंदूंनाच होतो असं नाही तर मुस्लिमांनाही होतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. यासह दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असंही राज ठाकरेंनी विधान केले. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “राज ठाकरे हे दंगली भडकविण्याचे काम करीत आहेत. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करतात. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही” असा खोचक टोला मिटकरींनी राज ठाकरे यांना लगावला.

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हाणाले, “दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहेत. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असले त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत. राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे, अशा शब्दात टीका केली.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!