मुंबई: आज पुण्यातील MCA स्टेडियमवर IPL 2022 च्या २९ व्या सामन्यात CSK चा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. सलग चार पराभवानंतर चेन्नईने मागच्या सामन्यात आरसीबीला पराभूत करत अखेर यशाची चव चाखली. तर दुसरीकडे गुजरातला गेल्या सामन्यात स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला आहे.
चेन्नईने (CSK) त्यांचा पहिला गेम जिंकून स्पर्धेत अजूनही स्थान टीकवले आहे. त्यांची मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना आणखी काही विजय मिळवण्याची गरज आहे. CSKचा कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाला (Ravindra jadeja) दिलासा मिळाला होता. गतविजेत्या चेन्नईकडे विजय मिळवण्यासाठी पुरेसा वेळ आहे. आज गुजरात विरुद्ध ते पुन्हा तिच कामगिरी करू पाहतील.
गुजरात टायटन्सने (GT) पहिले तीन सामने जिंकल्यानंतर SRH विरुद्धचा पहिला सामना गमावला. दोन्ही डावात खेळावर पूर्ण नियंत्रण असणार्या हैदराबादचे पूर्ण सामन्यात नियंत्रण दिसले. चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. तर दुसरीकडे पहिलाच हंगाम खेळणारे गुजरात टायटन्सही प्रतिभावान खेळाडूंनी भरलेले आहे. ज्यामुळे आजची लढतीत मोठी चुरस दिसून येईल.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 CSK vs GT : मॅचपूर्वी महेंद्रसिंह धोनी बनला ‘स्पिनर’; VIDEO होतोय व्हायरल!
- “राज ठाकरे हे दंगली भडविण्याचे काम…”; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका
- महसूलमंत्री असताना झालेल्या व्यवहाराची चौकशी होणार, राणेंच्या अडचणीत वाढ!
- “मी विराटला बॉलिंग केली असती, तर…”, पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं कोहलीबाबत ‘धक्कादायक’ वक्तव्य!
- IPL 2022 PBKS vs SRH : हैदराबादनं जिंकला टॉस; पंजाबचा मयंक अग्रवाल संघाबाहेर; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!


