Share

IPL 2022 : “शिकणं कधीच थांबत नसतं…”, विजेतेपद पुन्हा हुकल्यानंतर विराटची RCBच्या चाहत्यांसाठी भावूक पोस्ट!

Published On: 

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएलचे विजेतेपद पुन्हा एकदा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. बंगळुरूचा (RCB) संघ नशिबाच्या जोरावर आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या प्लेऑफमध्ये पोहोचला आणि एलिमिनेटर जिंकूनही पहिल्यांदाच चॅम्पियन होण्याच्या आशा उंचावल्या. पण, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानसमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, राजस्थानने जोस बटलरच्या नाबाद १०६ धावांच्या जोरावर हे लक्ष्य सहज गाठले आणि अंतिम फेरी गाठली.

बंगळुरू प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने टीमच्या चाहत्यांसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट ट्वीट केली आहे. विराटने म्हटले, ”कधी तुम्ही जिंकता तर कधी नाही. पण 12th मॅन आर्मी म्हणून तुम्ही शानदार होता. आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. कठीण काळातही प्रोत्साहन दिले. तुम्ही क्रिकेटला खास बनवले आहे. शिकणे कधीच थांबत नाही. संघ व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि या फ्रेंचायझीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाचे आभार. पुढच्या हंगामात भेटू. प्ले बोल्ड.”

आयपीएल २०२२ विराट कोहलीसाठी चांगले राहिले नाही. या मोसमात तो तीनदा गोल्डन डकचा बळी ठरला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्याने ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर षटकार ठोकून चांगली सुरुवात केली. पण पुढच्याच षटकात तो प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. या मोसमात त्याने १६ सामन्यात ३४१ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!