मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आणि फिरकीपटू युझवेंद्र चहलसाठी चांगला गेला आहे. बटलरकडे ऑरेंज कॅप तर चहलकडे पर्पल कॅप आहे. चहल सध्या मोसमातील संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या मोसमात चहलने त्याच्या गोलंदाजीबद्दल बटलरसोबतच्या त्याच्या मस्तीबद्दल खूप चर्चा केली आहे. बटलरसोबत ओपनिंग करण्याबाबत तो सतत बोलत असतो. आता त्याचा एक नवीन व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये चहल म्हणतो, ”जोस भाईने ८०० धावा केल्या आहेत, पण मी सलामीवीर असतो तर आतापर्यंत १६०० धावा केल्या असत्या. मी ऑफ स्पिन देखील टाकतो. मला खूप वेग आहे. तुम्हाला पहिला चेंडू ताशी ११५ किलोमीटर वेगाने टाकावा लागेल. मग लोक विचार करतात की हा लहान मुलगा आहे आणि तो काय गोलंदाजी करेल. यानंतर पुढील चेंडू वेगात फेकून फलंदाजाला बाद करावे लागते. मी १६५च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो.”
"Boom! Finish." ???? @yuzi_chahal#RoyalsFamily | #HallaBol pic.twitter.com/z1uK6PZQwg
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 28, 2022
या हंगामात खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये, चहलने 26 विकेट घेतल्या आहेत. सध्या तो आणि आरसीबीचा वानिंदू हसरंगासह संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. फायनल जिंकण्यासाठी राजस्थानला चहलच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल. बंगळुरूविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चहलला छाप पाडता आली नाही. त्याने आपल्या चार षटकात ४५ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. अंतिम सामन्यात चहल कोणतीही कसर सोडू इच्छित नाही आणि राजस्थानला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

