मुंबई : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्सची नजर त्यांच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदावर आहे. गुजरात आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना रंगणार आहे.
विशेष म्हणजे आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये पुन्हा एकदा फलंदाज धावांचा वर्षाव करू शकतात. टी-२० लीगच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आतापर्यंत यंदाच्या हंगामात ४ शतके झळकावली आहेत. बटलरने १६ डावात ५९ च्या सरासरीने ८२४ धावा केल्या आहेत. ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. म्हणजेच ८ वेळा त्याने ५० पेक्षा जास्त धावांची खेळी खेळली आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५१ राहिला आहे. त्याच वेळी, संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला ४५० धावाही करता आल्या नाहीत. हे त्यांच्या चांगल्या कामगिरीवरून समजू शकते.
गुजरात टायटन्सकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ४ अर्धशतकांसह १३३ च्या स्ट्राइक रेटने ४५३ धावा केल्या आहेत. त्याचवेळी संघाचा आणखी एक फलंदाज डेव्हिड मिलरने ६५ च्या सरासरीने ४४९ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १४१ आहे. पंड्या आणि मिलर हे दोघेही राजस्थानविरुद्धच्या आतापर्यंतच्या २ सामन्यात बाद झालेले नाहीत. जोस बटलर, पंड्या आणि मिलरच्या धावा जोडल्या तर तो १७०० हून अधिक होतात. हे तीन खेळाडू अंतिम फेरीत महत्त्वाचे ठरणार आहेत. जिथे बटलर सुरुवातीपासूनच संघाला सांभाळतो आणि आक्रमक फलंदाजी करतो. तर दुसरीकडे, मिलर आणि पंड्या यांनी आतापर्यंत मधल्या फळीत संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.
This dream is a work in progress. ????
See you tonight. ????#RoyalsFamily | #IPLFinal | #GTvRR pic.twitter.com/L3W1PS9VkH
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2022
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २० च्या सरासरीने २६ गडी बाद केले आहेत. ४० धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची इकॉनॉमी ८ च्या आसपास आहे. त्याने यंदाच्या हंगामात हॅटट्रिकही घेतलेली आहे. गुजरातकडून संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर आहे. त्याने आतापर्यंत २४ च्या सरासरीने १९ बळी मिळवले आहेत. २५ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची इकॉनॉमी ८ च्या जवळ आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

