🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात खेळताना दिसणार आहे. २६ मार्चपासून हंगाम सुरू होणार आहे. विराट पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी विराटने सोशल मीडियावर स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला होता ज्यामध्ये तो आरसीबी संघाच्या जर्सीत दिसत आहे.
विराट कोहलीने आज बुधवारी स्वतःचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ”आता जास्त वेळ शिल्लक राहिलेली नाही.” सोशल मीडियावर विराटच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा हा फोटो पाहून १८ हजारांहून अधिक युजर्सनी त्याला लाइक केले. याशिवाय हा फोटो ३०००हून अधिक वेळा रिट्वीट झाला आहे.
Not too long to go now⏳ pic.twitter.com/CzFOYqf53M
— Virat Kohli (@imVkohli) March 23, 2022
३३ वर्षीय विराट हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. या लीगमध्ये त्याने २०७ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ६२८३ धावा केल्या आहेत. गेल्या मोसमात त्याने १५ सामन्यात ३ अर्धशतकांसह ४०५ धावा केल्या होत्या. २००८ पासून तो या लीगचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
