पंजाब : आम आदमी पार्टीने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला (Harbhajab Singh) पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याची घोषणा केली आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे आमदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांनाही आप ने पंजाबमधून राज्यसभेवर पाठवले आहे. तसेच यापूर्वीच आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक (Sandeep Pathak) यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याची घोषणा आपकडून करण्यात आली होती.
पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ९२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला या पाच जागा मिळू शकतात. २१ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून आतापर्यंत आम आदमी पक्षाकडून तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सर्वप्रथम डॉ. संदीप पाठक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतु, अद्यापही राज्यसभेसाठी आम आदमी पक्षाकडून दोन नावांची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे.
दरम्यान, भगवंत मान यांनी हरभजन सिंग यांनी निवड केल्याचे बोलले जात आहे. हरभजन सिंग राज्यसभेत जाऊन खेळाडूंशी संबंधित मुद्दे मांडतील, अशी आशा भगवंत मान यांनी व्यक्त केली आहे. आम आदमी पार्टी लवकरच आणखी दोन नावांवरून पडदा हटवू शकते. २१ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या शत्रूंनी शिवचरित्रातील ‘हा’ धडा घ्यावा- संजय राऊत
- मी सत्तेपुढे झुकणार नाही! महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा स्वभाव एकच- संजय राऊत
- सोनम कपूर होणार आई! इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली खुशखबरी..
- IPL 2022 : कमाल लाजवाब राहुल..! लखनऊच्या कॅप्टननं गाळला घाम; PHOTO झाले व्हायरल!
- ग्रेटच..! भल्याभल्यांना मागे टाकत ‘चिन्नाथाला’ सुरेश रैनाला मिळाला मोठा सन्मान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

