🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांनतर शिवाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शेर शिवाजी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आलीआहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात पहायला मिळाली. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती कथा चित्रपटाच्या रुपात येईल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शेर शिवराज’ असं या चित्रपटाचं नाव आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,’ असं लिहित दिग्दर्शक दिग्पाल आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पहायला मिळणार आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
