🕒 1 min read
पुणे : आता शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ करतानाच उभ्या पिकाची छायाचित्र तसेच या पिकाची खरेदी केंद्रावरच विक्री करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे सहज शेतकरी पिकांची नोंद आणि खरेदीची नोंद करू शकणार आहेत. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा शिवाय खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास त्याची सोय आता ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अँपमध्येच असणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना सोयीस्कर सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत.
सध्या ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून केवळ पिकांची नोंदणी केली जात आहे. यानंतर जर पिकाचे नुकसान झाले तर पुन्हा पंचनामा करावाच लागतो आणि आर्थिक मदतीसाठी पुन्हा विभागाकडे द्याव्या लागतात. पुर्वसुचना किंवा पंचनाम्याची सुविधा ही या अँपमध्ये नाही. पण आता नुकसान होताच पिकाचा फोटो अपलोड करण्याची सुविधा ही याच अँपमध्ये दिली जाणार आहे.
खरेदीच्या नोंदणीचीही सुविधा –
शेतीमाल हा खरेदी केंद्रावर विक्री करायचा असेल तर महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ अँपवर भरलेल्या माहितीचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, या अँप नोंदणीची सुविधा नाही. उदा. हरभरा पीकाची ‘ई-पीक पाहणी’ करुन झाली की लगेच शेजारी असलेल्या नोंदणी बटणाला क्लिक करुन खरेदीसाठीची नोंदणीही शक्य होणार आहे. त्यामुळे पुन्हा त्यासाठी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
