Share

“औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय ते आधी सांगा”, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ते आज (२१ मार्च) माध्यमांशी संवाद साधत होते. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना (sanjay raut )सवाल केला आहे.

“मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्थानला कधी जोडत आहात? इति संजय राऊत उवाच. मोदीजी करतीलच, तुम्ही तुम्हाला झेपतेय तेवढंच बोला. औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता आहात ते आधी सांगा.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना सवाल केला आहे.

दरम्यान सध्या देशभरात आणि राज्यात ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून राजकारण रंगताना दिसून येते आहे. काँग्रेसकडून या चित्रपटात सत्यता लपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपकडून हा चित्रपट म्हणजे कॉंग्रेसमुळे काश्मिरी जनतेला भोगावे लागणारे अन्याय, अत्याचार असल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!