Share

IPL 2022: मेगा ऑक्शननंतर अवघ्या आठवड्यात सनरायझर्स हैद्राबादच्या कोचने दिला राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ दिमाखात पार पडले आहे. ज्यात कोटींची उलाढाल झाली. अनेक खेळाडू मोठ्या किंमतीत गेले तर काही स्टार असलेले खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यंदा १० संघ स्पर्धेचा भाग असणार आहे. ज्यांनी मेगा ऑक्शनमधून संघ तयार केला आहे. सनरायझर्स हैद्राबादने देखील चांगले खेळाडू निवडले आहेत. मात्र स्पर्धा सुरु होण्याआधीच त्यांना धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिचने २०२२ ची आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या (sunrisers hydrabad) सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेतून राजीनामा दिला आहे. संघाचे व्यवस्थापन कसे केले जात आहे यावरील मतभेदानंतर आणि मेगा ऑक्शनसाठी रचलेल्या रणनीतीचेही पालन न केल्याने त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या हंगामात, सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला त्यांच्या कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर आणि उर्वरित सीजनमध्ये त्याला संघातून बाहेर केल्यामुळे कॅटीचन मोठ्या वादात सापडले होते. तेव्हा, पूर्व कोच ट्रेव्हर बेलिस आणि ब्रॅड हॅडिन यांनी त्यांच्या भूमिका सोडल्या आणि त्यांच्या जागी टॉम मूडी आणि सायमन कॅटिच यांची निवड केली गेली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!