मुंबई: कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. तर आज जनतेला वास्तव कळावे, म्हणून सोमय्या कोर्लई गावाकडे रवाना झाले आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या यांनी खरच बंगले असतील तर दाखवून द्यावे. कारण त्यांना स्वप्नातही बंगले दिसत आहेत. तसेच काही दिवसांनी राज्यातील जनता त्यांची धिंड काढणार असल्याचे म्हटले आहे.
किरीट सोमय्या पागल झाले आहेत. त्यांना सप्नातही बंगले दिसत आहेत. त्यांना त्यांचीच बेनामी संपत्ती असलेली बंगले स्वप्नात दिसतात. तसेच कोर्लई जमिनीवर एकही जमीन नाहीये. तरी सोमय्या यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. त्यामुळे भाजपातील नेत्यांना भुताटकीने झपाटले आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. त्यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजप बोलत नाही. पण अन्वय नाईकला ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली, त्याच्या समर्थनार्थ भाजप होते. याच अन्वय नाईकने भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली आहे. कारण ते अर्णव गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्या यांनीअन्वय नाईकला धमक्या दिल्या आहेत. अर्णव गोस्वामीला बिले पाठवायची नाहीत, यासाठी किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक दोन वेळा धमकी दिली आहे. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच अन्वय नाईक मराठी उद्योजक होते. भाजपने त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी “भाजपाचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे,” असं म्हणत पुन्हा एकदा बाप आणि बेटे जेलमध्ये जातील असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना टोला
- “…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना टोला
- नारायण राणेंना बीएमसीची नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
- “विराट माझ्याजवळ आला आणि मी…” ; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा


