🕒 1 min read
मुंबई : मालेगावमधल्या उर्दू घर इमारतीला हिजाब गर्ल मुस्कान खानचे (Muskan Khan) नाव देण्यात आले असून राज्य शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या या इमारतीला मुस्कानचे नाव देण्याचा ठराव मालेगाव महापालिकेच्या गुरुवारी(१७ फेब्रु.) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. तद्पश्चात या मुद्द्यावरून आता नवीन वादाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या मुद्द्याला अनुसरून भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मालेगावच्या उर्दू घराला ‘हिजाब गर्ल’चे नाव देण्याचा मतदानावेळी शिवसेनेने मतदानच केले नाही. फक्त भाजपने विरोध केला. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अन्याय करणाऱ्या निर्णयात काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत शिवसेनाही.’ तसेच सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आता थेट लांगूलचालन, असा घणाघात उपाध्ये यांनी केला आहे.
मालेगावच्या उर्दू घराला 'हिजाब गर्ल'चे नाव देण्याचा मतदानावेळी शिवसेनेने मतदानच केले नाही. फक्त भाजपाने विरोध केला. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अन्याय करणाऱ्या निर्णयात कॅाग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेनाही. सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आता थेट लांगूलचालन
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 18, 2022
दरम्यान, या ठरावाला भाजपने जोरदार विरोध केला, तर शिवसेनेने ठरावाच्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तद्पश्चात बहुमताच्या जोरावर महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- नारायण राणेंना बीएमसीची नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- IND vs WI: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा टी २० सामना आज रंगणार
- मुंबईत जामीन मिळताच हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलिसांनी बजावली नोटीस
- “विराट माझ्याजवळ आला आणि मी…” ; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
