Share

‘मुंबई आई तर कल्याण डोंबिवली आपली मावशी आहे’ – आदित्य ठाकरे

Published On: 

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वि.दा. सावरकर सभागृहाचे तसेच स्मार्ट सिटी डेवलपमेंटच्या (Smart City Development) माध्यमातून नदी किनारा विकसित करणे, डायलिसीस सेंटरचे उद्घाटन करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील ५५ कोटीच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, व इतर मान्यवर उपस्थित होते.

विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पहावी लागत होती मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे. दिल्लीतून फंड आला पाहिजे असे सांगतानाच गोव्यात प्रचार करत होतो इतर राज्यात पण शिवसेना निवडणूक लढत आहे , त्यामुळे २०२४ नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असे सूचक विधान करत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे २०२४ चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक इशारा मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना मंत्री ठाकरे यांनी डोंबिवली कल्याण शहराकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मुंबई हि आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!