🕒 1 min read
मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ दिमाखात पार पडले आहे. ज्यात कोटींची उलाढाल झाली. अनेक खेळाडू मोठ्या किंमतीत गेले तर काही स्टार असलेले खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यंदा ऑक्शनमध्ये अनकॅप्ड खेळाडूंची सुद्धा चांदी झाली आहे. संघानी डोमेस्टिक खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंनाही विश्वासाने खरेदी केले आहे. मात्र यात असे एक नाव आहे जो टेनिस क्रिकेट मधून थेट आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे.
टेनिस क्रिकेट राज्यस्तरावर खूप प्रसिद्ध आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरून पंजाबचा एक तरुण क्रिकेटपटू, रमेश कुमार (टेनिस-बॉल क्रिकेटर) आयपीएल मध्ये सामील झाला आहे. रमेश कुमार त्याच्या लांब सिक्सर मारण्याच्या क्षमतेमुळे निवडला गेला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा खेळाडू लेदर बॉलपेक्षा टेनिस बॉलने जास्त क्रिकेट खेळला आहे, परंतु त्याच्या शहरात तो लांब सिक्सर मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला येथे नारायण जलालाबादिया (Narine jalalabadiya) म्हणून ओळखले जाते. रमेशने एका स्पर्धेत १० चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
विशेष म्हणजे रमेश कुमारने आतापर्यंत प्रथम श्रेणी तर दूर लिस्ट ए आणि टी २० स्तरावर कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही. म्हणजेच बीसीसीआयने मान्यता दिलेल्या एकही स्पर्धेत तो अद्याप खेळलेला नाही. मात्र असे असतानाही कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने जलालबादियाला लांब षटकार मारण्याच्या क्षमतेमुळे आपल्या संघात घेतले आहे. त्याची बेस प्राईस २० लाख रुपये होती आणि त्याच किंमतीसाठी KKR ने त्याला खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली”, भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना टोला
- IND vs WI: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा टी २० सामना आज रंगणार
- नारायण राणेंना बीएमसीची नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- “साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले मोदी सरकार चुका मान्य न करता नेहरूंना दोष देतात’, मनमोहन सिंग यांनी सुनावले
- “विराट माझ्याजवळ आला आणि मी…” ; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
