Share

IPL 2022 RR vs KKR :सुनील नरिनने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला कोलकाताचा पहिलाच खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा ३० वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताच विंडीजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरिन याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरीन (sunil narine) कोलकाता नाइट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध १५० वा सामना खेळत आहे. केकेआरसाठी अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सुनील नरिननंतर कोलकात्याकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गौतम गंभीर आणि युसूफ पठाण यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी कोलकाताकडून १२२-१२२ सामने खेळले आहेत.

नरिनने त्याच्या १५० सामन्यात १४९ विकेट्स घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात नरिनने गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र सलामीला फलंदाजीसाठी उतरल्यावर तो शून्यावर माघारी परतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने कोलकात्याला २१८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!