Share

IPL 2022 : कुठंय बॉल..! गगनचुंबी षटकार ठोकत जोस बटलरचा उमेश यादववर ‘हवाई हल्ला’; पाहा VIDEO

Published On: 

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलर आयपीएल २०२२ मध्ये गोलंदाजांचा काळ म्हणून उदयास आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हंगामातील ३० वा सामना खेळला जात आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. जिथे जोस बटलरने KKR चा सर्वोत्तम गोलंदाज उमेश यादवला १०० मीटरचा षटकार ठोकला आहे.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सची सलामीची जोडी अडचणीत आली होती. कारण उमेश यादव आणि शिवम मावी यांनी पहिल्या दोन षटकांत जोस बटलर आणि देवदत्त पडिकल यांना शांत ठेवले. पण फॉर्मात असलेला फलंदाज जॉस बटलरला जास्त काळ गप्प बसवणे अवघड आहे, डावाच्या तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उमेश यादव आक्रमणावर येताच जोस बटलरने (jos buttler) शॉर्ट बॉल वाइडच्या दिशेने मारला. ज्यामुळे लॉन्ग ऑनला १०० मीटरचा षटकार गेला.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1516060538568327173?s=20&t=ywSFB97CHPQEsRAdHIqhPA

जोस या सामन्यात दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने केवळ २९ चेंडूत अर्धशतक झळकवले आहे. सोबतच तो या हंगामात ३०० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. आतापर्यंत ६ सामन्यात त्याच्या बॅटमधून २१ षटकार निघाले आहेत. या हंगामाचे पहिले शतक देखील त्यानेच झळकावले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!