Share

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग ६ पराभवानंतर झहीर खानचे मोठे वक्तव्य; म्हणाला “फक्त एक विजय…”

Published On: 

मुंबई: आयपीएलचा १५वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी भयावह स्वप्नापेक्षा कमी दिसत नाहीये. ज्या संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, त्यांना अद्याप IPL 2022 लीगचा एकही सामना जिंकता आलेला नाहीये. मुंबईला यंदा सहावेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक झहीर खानने या संबधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

झहीर खान (Zaheer khan) म्हणाला, “हा एक खेळ आहे संघातील सर्व खेळाडूंनी योगदान देण्याचा आहे. म्हणून आम्हाला एकत्र राहावे लागेल, एकत्र येण्याचे मार्ग शोधावे लागतील आणि नंतर एक शक्ती बनावे लागेल. प्रत्येक हंगामात आव्हाने असतात, तिथे दबावही असतो. त्यामुळे त्यांना सामोरे जाण्यासाठी पूर्ण तोडगा काढावा लागेल. ब्रेव्हिसच्या खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तो चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, त्याने आतापर्यंत चांगली खेळी खेळली आहे.”

प्रशिक्षक झहीरने खेळाडूंच्या मनोधैर्यावर आपले वक्तव्य केले आहे. “खेळाडू गोष्टी बदलण्यास उत्सुक असतात आणि आम्हाला फक्त त्यांना समर्थन द्यावे लागेल. सातत्यपूर्ण पराभवामुळे खेळाडूंचे मनोधैर्य खचते. आम्हाला फक्त एक विजयाची गरज आहे, जिथे लोक आशा करत आहेत की हा विजय मुंबईला कायम ठेवेल. खेळाडूंनी निराश होऊ नये. विजय – पराभवाचा खेळ सुरूच असतो, पण आता त्यांचे मनोबल वाढवण्याची वेळ आली आहे.”

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!