मुंबई : राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर याने (Jos Buttler) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दुसरे शतक ठोकले आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या (RR vs KKR) सामन्यात बटलरने दमदार फलंदाजी करत शतक साकारले. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात बटलरने देवदत्त पडिक्कलसोबत सलामी दिली. पडिक्कलला (२४) जास्त वेळ मैदानावर राहता आले नाही. कोलकात्या फिरकीपटू सुनील नरिनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मात्र बटलरने एकहाती किल्ला लढवत फलंदाजी केली. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या बटलरने ६१ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. १७व्या षटकात तो बाद झाला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला वरुण चक्रवर्तीकरवी झेलबाद केले.
Drop an emoji & let us know how much you enjoyed that @josbuttler knock ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR | @rajasthanroyals pic.twitter.com/hw1Potr08I
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
???? @josbuttler ????
Lighting up #IPL2022 ????
???? #RedRoseTogether
— Lancashire Cricket Men (@lancscricket) April 18, 2022
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

