मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कप्तान विराट कोहलीची बॅट शांत आहे. तो धावांसाठी झगडत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात कोहली गोल्डन डकवर बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर त्याला विश्रांती देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पण, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना हे मान्य नाही. त्यांनी कोहलीला खडसावले आहे.
विराट कोहलीने आयपीएलच्या १२ सामन्यांमध्ये १११च्या स्ट्राईक रेटने २१६ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहेय. आयपीएलमधील त्याची ही सर्वात खराब कामगिरी आहे. या कारणास्तव त्यांना ब्रेक देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यावी, असे म्हटले होते. अनेक दिग्गजांनीही शास्त्रींचा सूर ऐकत कोहलीला विश्रांती देण्याचा सल्ला दिला होता. मात्र गावसकरांनी याला विरोध केला आहे.
Third golden duck for Virat Kohli in #IPL2022 so far.
????: Disney+Hotstar pic.twitter.com/hxemKwzRiw
— CricTracker (@Cricketracker) May 8, 2022
कोहलीबद्दल स्टार स्पोर्ट्सवर सुनील गावसकर म्हणाले, “ब्रेक म्हणजे विराट भारताच्या सामन्यांना मुकेल असे नाही. भारतासाठी खेळणे हे त्याचे पहिले आणि सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. ते अतिशय स्वच्छ आणि सरळ आहे. माझा विश्वास आहे, की जर तू अजिबात खेळला नाहीस, तर तुझा हरवलेला फॉर्म कसा मिळणार? ड्रेसिंग रूममध्ये बसून तुझा फॉर्म परत येणार नाही. तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही जुन्या रंगात परत येण्याची शक्यता जास्त आहे.”
“तुम्ही जा आणि संपूर्ण भारताला विचारा, जो कोणी क्रिकेट जाणतो आणि हा खेळ फॉलो करतो, प्रत्येकजण म्हणेल की आम्हाला भारतासाठी कोहलीचा फॉर्म परत हवा आहे. त्यामुळे तुम्ही टीम इंडियासाठी खेळण्यापासून विश्रांती घेऊ शकत नाही. कोहलीने भारतासाठी धावा करायला सुरुवात करावी अशी तुमची इच्छा आहे. आम्हा सर्वांना तेच हवे आहे. त्याला पुन्हा मोठ्या धावा करताना पाहायचे आहे”, असे गावसकरांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

