Share

सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरुद्ध तक्रार!

Published On: 

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. दोघांमध्ये शाब्दिक वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढतच आहेत. हा वाद आता आणखी जास्त पेटण्याची शक्यता आहे. आपण संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. याबाबतचं सोमय्यांनी काल फेसबूक पोस्ट देखील केली होती.

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आपलं चारित्र्यहनन केल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांच्या विरोधात मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आयपीसी कलम ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करावी, अशी मागणी मेधा सोमय्यांनी केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये शौचालय घोटाळा केला, यात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असे आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते.

सोमय्या कुटुंबीयांनी १०० कोटींचा घोटाळा करत सर्वसामान्यांचा पैसा लाटल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर झाल्याचा वारंवार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत होते. आता या प्रकरणात माफी मागण्यासाठी सोमय्यांनी अल्टिमेटम दिला होता. मात्र संजय राऊतांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोमय्या कुटुंबांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुलूंडच्या पोलीस ठाण्यात सोमय्या कुटुंबीयांसह दाखल झाले.

सोमाय्यांवर काय आहेत आरोप ?

मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. यापैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळालं. सोमय्या कुटुंबाचं युवक प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कंत्राट मार्गी लावण्यात आलं. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!