पुणे : पुण्याच्या एमसीए मैदानावर आज आयपीएल २०२२ पहिला सामना खेळवला जात आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद संघ संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. या सामन्यात विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात एकूण १५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी सनरायझर्स हैदराबादने ८, तर राजस्थान रॉयल्सने ७ सामन्यात यश मिळवले आहे. गेल्या मोसमात दोघांमध्ये दोन सामने झाले, ज्यात हैदराबादने एक आणि राजस्थानने एक सामना जिंकला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कप्तान), निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कप्तान), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, यजुर्वेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या –
- “माझी आई माझ्याशी २६-२७ वर्ष खोटं बोलली…”, केएल राहुलनं सांगितला आपल्या नावाबाबतचा किस्सा!
- मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी
- मंत्री अनुराग ठाकूर आणि रणवीर सिंगचा मल्हारी गाण्यावर जोरदार डान्स, पहा…
- IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सनं कसा दिला RCBला निरोप? विराटनं सांगितली पडद्यामागची गोष्ट!
- पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

