मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील लीग टप्प्यातील शेवटचा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात खेळवला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात हैदराबादचा कप्तान भुवनेश्वर कुमारने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसन घरी परतल्यामुळे भुवनेश्वर कुमारकडे हैदराबाद संघाची धुरा आहे. दोन्ही संघ आधीच बाद झाल्याने या सामन्याला प्लेऑफच्या दृष्टिकोनातून महत्त्व नाही. मात्र, हा सामना जिंकून हैदराबाद आणि पंजाब हे दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील.
A look at the Playing XI for #SRHvPBKS
Live – https://t.co/qbGsqiPHrc #TATAIPL https://t.co/ECGqy1BPIz pic.twitter.com/6Vfa9Ph7r0
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
हैदराबादचा संघ सहा विजयांसह आणि १२ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर पंजाबचेही १२ गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे ते सातव्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेच्या मध्यभागी सलग पाच विजयांची नोंद केली, परंतु त्यानंतर संघ कधीच चांगल्या स्थितीत राहिला नाही. कर्णधार केन विल्यमसनची फलंदाज म्हणून खराब कामगिरी संपूर्ण स्पर्धेत कायम राहिली आणि त्याचा फटका त्याच्या संघाला सहन करावा लागला.
मेगा लिलावानंतर पंजाबचा संघ खूपच मजबूत दिसत होता आणि एवढ्या मजबूत संघामुळे हा संघ किमान प्लेऑफमध्ये तरी नक्कीच पोहोचेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. कर्णधार मयंक अग्रवालही खराब फॉर्ममध्ये राहिला आहे.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार (कप्तान), फजलहक फारुकी, उमरान मलिक.
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कप्तान), शाहरुख खान, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रेरक मंकड, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

