Share

IPL 2022 : स्टेडियममधून फायनल बघायचीय? ‘अशी’ मिळवा तिकीटं; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. लीग टप्पा आज रविवारी संपेल आणि मंगळवारपासून प्लेऑफ सामने सुरू होतील. यासाठी अहमदाबाद आणि कोलकाता ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बीसीसीआयने स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेबाबत घातलेले निर्बंध आता हटवण्यात आले असून प्लेऑफदरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम १०० टक्के भरले जाणार आहे. दरम्यान, प्लेऑफच्या सामन्यांची, फायनलच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे.

मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये, टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा सामना पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सशी होईल. त्याचवेळी, दुसऱ्या दिवशी बुधवारी, लीग टप्पा संपल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शनिवारपासूनच अंतिम सामन्याच्या ऑनलाइन तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. आयपीएल फायनलचे सर्वात महाग तिकीट ६५ हजार आणि सर्वात स्वस्त ८०० रुपये आहे. बीसीसीआयचे अधिकृत तिकीट भागीदार BookMyShow वरून तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येतील. क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरसाठी सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत ८०० रुपये आहे. तर, क्वालिफायर-२ आणि फायनलसाठी तिकीटाची किंमत ५०० ते ६५ हजार रुपये असेल.

यासाठी तुम्हाला BookMyShow च्या अकाउंटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर तिकीट खरेदी करण्यासाठी तुमचे वॉलेट रिचार्ज करावे लागेल. यानंतर, मॅच आणि सीट निवडून, तुम्ही तिकिटासाठी पैसे देऊ शकाल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!