🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी कधी प्लास्टीकच्या पिशव्यांनी बनवलेली ड्रेस तर कधी सेफ्टी पिनने बनवलेले ड्रेस घालत असते. पण यावेळी उर्फिने कमालच केली काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस तिने परिधान केला आहे. तिच्या विचित्र ड्रेसिंगने चाहत्यांना थक्क केले.
उर्फिचे इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत आणि म्हणूनच अभिनेत्रीने एका पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमध्ये उर्फिने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि टॉप घातलेला दिसला. याचसोबत काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला श्रग परिधान केलेला दिसत आहे. या फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.
https://www.instagram.com/p/Cd076iIqYUx/
सोशल मिडीयावर व्हायरल फोटोवर आणि व्हिडीओवर अनेक लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यामध्ये एका यूजरने लिहिले, ‘ती अशी कशी बसेल?’ दुसऱ्याने लिहिले, ‘ती प्रवास कसा करू शकते?’ त्याचप्रमाणे अनेक युजर्स हसणारे इमोजी पाठवत आहेत.
उर्फिने अनेक मालिकांमध्ये काम केल आहे. तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आणि ‘पंच बीट सीझन 2′ यासह अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. अजून “ये रिश्ता क्या कहलाता है” यात देखील उर्फी काही काळ दिसली. कसौटी जिंदगी की 2’ मध्ये तनिषा चक्रवर्तीची भूमिकाही उर्फिने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
