Share

IPL 2022 SRH vs GT : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राशिद खान! विल्यमसननं जिंकला टॉस आणि घेतला….

Published On: 

मुंबई : आज डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२चा २१वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगत आहे. या सामन्यात केन विल्यमसनच्या हैदराबादसमोर हार्दिक पंड्याच्या सुसाट गुजरातला रोखण्याचे आव्हान आहे. विल्यमसनने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पहिले दोन सामने गमावलेल्या हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. संघाचे फलंदाज लयीत दिसले आणि त्यामुळे त्यांनी आठ गडी राखून मोठा विजय मिळवला. अभिषेक शर्माने लागोपाठ मिळालेल्या संधींचा फायदा घेत मोठी खेळी खेळून स्वत:ला सिद्ध केले. कर्णधार केन विल्यमसनच्याही बॅटमधून धावा निघाल्या.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सने शेवटचा सामना अतिशय रोमांचकारी पद्धतीने जिंकला असून त्यांना या स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव पत्करावा लागला नाही. शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत, तर क्रमवारीत उतरलेल्या डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी मोठे फटके मारले आहेत.

दोन्ही संघांची Playing XI

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन.

गुजरात टायटन्स – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!