Share

क्रिकेटमध्ये Retired Out म्हणजे नक्की काय रे भाऊ? आणि ते Retired Hurt पेक्षा वेगळं कसं? नक्की वाचा!

Published On: 

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा रवीचंद्रन अश्विन हा इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएल २०२२च्या २०व्या लीग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध फलंदाजी करताना अश्विननं अचानक क्रीज सोडली आणि पॅव्हेलियन गाठलं. या सामन्यात राजस्थाननं त्याला डावाच्या १०व्या षटकात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. मात्र, त्याला मोठे फटके खेळण्यात अपयश आलं आणि त्यानं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला.

रिटायर्ड आऊट म्हणजे काय?

जेव्हा एखादा फलंदाज पंच किंवा विरोधी संघाच्या कर्णधाराशी सल्लामसलत न करता त्याच्या डावाच्या मध्यभागी मैदान सोडतो तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट समजलं जातं. नियमानुसार तो बाद मानला जातो. एकदा फलंदाज रिटायर्ड आऊट झाल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.

रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये फरक काय?

रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊटमध्ये आपण गोंधळतो. रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज संघाच्या आवश्यकतेनुसार पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. फलंदाजी करताना फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यास तो मैदानाबाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत पंच त्याला आऊट देत नाहीत. तो फलंदाज पुन्हा खेळण्यासाठी मैदानात येऊ शकतो. या कारणामुळं त्याला रिटायर्ड हर्ट असं नाव देण्यात आलं आहे. अशा फलंदाजांच्या नावासमोर स्कोअरबोर्डवर रिटायर्ड हर्ट लिहिलेलं असतं.

राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीच्या १९व्या षटकात अश्विननं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला. त्यानं २३ चेंडूत २८ धावा केल्या. अश्विननं रिटायर्ड आऊट होऊन रियान परागला संधी दिली. रियान परागनं ४ चेंडूत ८ धावा केल्या. प्रत्येक आयपीएलमध्ये अश्विन कोणत्या-ना-कोणत्या कारणानं चर्चेत येतोच. एकदा तो मंकडिंगमुळं चर्चेचा विषय ठरला होता. आता क्रिकेटमध्ये रिटायर्ड आऊटचा नियम जेव्हा-केव्हा लागू होईल, तेव्हा अश्विनची आठवण नक्की येईल!

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!