🕒 1 min read
मुंबई :आयपीएलचा चौथा सामना नवीन IPL संघ गुजरात आणि लखनऊ यांच्यात खेळला गेला. हा सामना खूपच मजेशीर ठरला. सामन्यात गुजरातने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्याचा स्टार ठरला. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यानंतर तो हेडलाइन्स बनताना दिसत आहे. दरम्यान, एका अमेरिकन पॉर्नस्टारने त्याच्याबद्दल ट्विट केले आहे. त्यानंतर चाहते शमीची मज्जा घेताना दिसत आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) सामन्यात मोहम्मद शमीने LSGच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. तेव्हापासून सर्वांनाच त्याचे वेड लागले आहे. त्याने आपल्या धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर संघाला शानदार विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याला सामनावीराचा किताबही मिळाला. शमीच्या (Mohmmad shami) या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. दरम्यान, अमेरिकन पॉर्नस्टार केंद्रा लस्टलही शमीच्या गोलंदाजीवर फिदा झाली. तिने ट्विटरवर मोहम्मद शमीला टॅग करत लिहिले, ‘खूप उत्कृष्ट कामगिरी मोहम्मद शमी.’
या ट्विटवर अभिनेत्री केंद्रा लस्टचे चाहते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. चाहते ट्विटखाली विविध प्रकारच्या कमेंट करताना दिसतात. एकाने तर म्हटले की, “भाई शमी ही तुझ्या प्रेमात पडल्यासारखे वाटते.” तर बाकीचे चाहते म्हणाले, ‘भाई यार. त्याच्यासोबत काम करण्यासाठी शमी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.’ अशा प्रकारे चाहत्यांनी कमेंट करत शमीची मज्जा घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Women’s World Cup 2022 : भारीच ना..! विंडीजला धूळ चारत ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
- आपली लग्झरी कार सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास,पहा कोण आहे
- “…ही आहे पंतप्रधान मोदींची Daily To-Do List”, राहुल गांधींचे टीकास्त्र
- “उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला…”- भातखळकरांचा शरद पवारांना टोला
- “…तो तरुण एक दिवस राजकारणात नक्कीच यशस्वी होईल”- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
