Share

आपली लग्झरी कार सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास,पहा कोण आहे

Published On: 

मुंबई : अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी प्रवासासाठी मुंबई लोकलने प्रवास करून आपल्या करियरला सुरवात केली आहे. एवढंच नाही तर वेळेची बचत म्हणून अनेकदा सेलिब्रेटी आजही लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसतात.

अनेकदा त्यांचे व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो लोकलमधून प्रवास करताना दिसतोय मात्र या प्रवासात त्याला कोणीही ओळखलेलं नाही.

https://www.instagram.com/tv/Cbrnm3aFwwi/?utm_medium=copy_link

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हा अभिनेता मास्क आणि गॉगल लावून स्टेशनवर येताना दिसत आहे. एवढंच नाही तर लोकल ट्रेनमधून प्रवासही करताना दिसतोय. मात्र या प्रवासात त्याला कोणीही ओळखलेलं नाही. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा होताना दिसतेय आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नवाझुद्दीन सिद्दीकी आहे.

नवाझुद्दी सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग मीरा रोड येथे करत होता. मात्र त्यानंतर त्याला लगेचच आणखी एका इव्हेंटसाठी जायचं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी त्यानं आपली लग्झरी कार सोडून मुंबई लोकलनं प्रवास केला. त्याच्या या प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स

मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत

“त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी

यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!