Share

Women’s World Cup 2022 : भारीच ना..! विंडीजला धूळ चारत ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा १५७ धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. संघाने साखळी टप्प्यातील सातही सामने जिंकले. या सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४५ षटकांत ३ गडी गमावून ३०५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅलिसा हिलीने १०७ चेंडूत सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय रॅचेल हेन्सनेही ८५ धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी झाली. बेथ मुनीने ४३ धावा करत ऑस्ट्रेलियाला ३००च्या पुढे नेले.

वेस्ट इंडीजला ४५ षटकांत ३०६ धावांचे लक्ष्य मिळाले. त्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघ ३७ षटकांत १४८ धावांत गारद झाला. कर्णधार स्टेफनी टेलर (४८) वगळता एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. संघाच्या ६ फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनने २ बळी घेतले. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा विजयाचा विक्रम अतुलनीय आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ७४ पैकी ६५ एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!