Share

IPL 2022: श्रेयस अय्यर असेल आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार

Published On: 

बंगळुरू : श्रेयस अय्यरची बुधवारी आयपीएल २०२२ हंगामापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने श्रेयसला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. श्रेयसने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे नेतृत्व केले आहे आणि २०२० च्या हंगामात संघाला प्रथमच IPL फायनलमध्ये नेले होते.

श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे २०२१ हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातून बाहेर बसावे लागले होते. तेव्हा ऋषभ पंतने दिल्लीचे कर्णधार सांभाळले. श्रेयस हंगामातील युएई मध्ये झालेल्या टप्प्यासाठी परतला पण दिल्लीने पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयसला फ्रँचायझीने श्रेयसला रिटेन केले नाही.आणि मेगा ऑक्शनमध्ये कर्णधारच्या शोधात असलेल्या कोलकात्याने त्याला संघात घेतले. श्रेयसने इयॉन मॉर्गनकडून पदभार स्वीकारला, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

श्रेयसने कोलकात्याचे कर्णधारपद स्वीकारल्याचा आनंद व्यक्त केला आहे. “KKR सारख्या प्रतिष्ठित संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप सन्मान वाटतो. कोलकाता आणि ईडन गार्डन्सचा भारतीय क्रिकेटचा इतिहास खूप समृद्ध आहे. त्याचाच एक भाग बनण्यासाठी मी उत्सुक आहे. कोरबो लोरबो जीतबो!”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!