बुलडाणा: जिल्ह्यात तीन अभयारण्य आहेत, त्यामुळे बऱ्याचदा विविध वन्यप्राण्यांचे दर्शन शेत शिवारात होत असते, मात्र आता या वन्य प्राण्यांचा गाव शिवारात वाढता वावर पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पातुर्डा शिवारामधून गेल्या आठवड्यात वन विभागाने एका अस्वलाला डिटेन केले होते.
मात्र परत याच परिसरात एक भला मोठा अस्वल मुक्त संचार करतांना दिसून आला, त्यामुळे या अस्वलाचा देखील वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक तसेच शेतकरी करत आहेत. उन्हाळ्यामध्ये जंगलात खाण्याची आणि पाण्याची टंचाई पाहता वन्यप्राणी गाव शिवारात खाण्याच्या आणि पाण्याच्या शोधात येताना दिसत असतात, मात्र उन्हाळ्यापूर्वीच हे प्राणी गाव शिवारात आणि शेत शिवारात येत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:

