Share

IPL 2022 : मुूंबई इंडियन्सला मिळणार आनंदाची बातमी? जोफ्रा आर्चरविषयी इंग्लंड बोर्ड घेऊ शकतं ‘असा’ निर्णय!

Published On: 

बंगळुरू : आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. ज्यात काही जण मोठ्या किंमतीत विकले गेले तर काही अनसोल्ड राहिले आहेत. जोफ्रा अर्चारचे नाव बोली मध्ये येथाच बऱ्याच संघांनी त्यावर बोली लावली मात्र शेवटी मुंबईने आर्चरला ८ कोटींमध्ये खरेदी केले होते. आर्चर यंदाचे सिजन खेळत नसतानाही मुंबईने त्याला भविष्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी संघात घेतले.

जोफ्रा अर्चारची बोली २०२३ आणि २०२४ सीझनमध्ये त्याच्या उपलब्धतेवर आधारित होती. या हंगामात आर्चर आयपीएलमध्ये सामील होऊ शकत नाही यासाठी ईसीबी सुरुवातीपासूनच आग्रही होता. आर्चर इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे तो आयपीएल मध्ये खेळू नये असे काही बोर्डातील अधिकाऱ्यांना वाटत होते. मात्र त्यांच्या या निर्णयावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

ECB यावर्षी आर्चरला कसोटी सामन्यांट खेळवण्यासाठी घाई करणार नाही. परंतु तो टी २० मध्ये परत येण्याची शक्यता आहे. आर्चर द हंड्रेडमध्ये सहभागी होऊ शकतो आणि त्याला आयपीएलमध्ये काही खेळ खेळण्याची परवानगी मिळू शकते. असे एका प्रसिद्ध वृतपत्राकाने अहवालात म्हटले आहे. आर्चर सध्या त्याच्या इंग्लंडच्या सहकाऱ्यांसोबत प्रशिक्षण घेत आहे. आर्चर जर याच हंगामात मुंबई इंडियन्स सोबत जोडला गेला तर याचा मोठा फायदा त्यांना आयपीएल मध्ये होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!