Share

IND vs BAN 1st Test | सचिन-गावस्करला मागे टाकत अवघ्या 10 धावांमध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ विक्रम

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN 1st Test | चट्टोग्राम: आज बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना (IND vs BAN 1st Test) जहुर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. केएल राहुल (KL Rahul) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघातील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreays Iyer) ने केवळ 10 धावांमध्ये आश्चर्यकारक विक्रम केला आहे. श्रेयस अय्यर हा लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये नाही, तर कसोटी क्रिकेटमध्येही अप्रतिम फलंदाजी करत असतो.

चट्टोग्राममध्ये सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने 10 धावा करतात इतिहास रचला आहे. श्रेयस अय्यरणे दहा धावा करताच तो भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने पहिल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 10 धावा केल्या आहेत. हा पराक्रम करणारा श्रेयस भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे. क्रिकेट कसोटीच्या इतिहासामध्ये भारतातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांसारखे खेळाडू देखील हा पराक्रम करू शकले नाही.

यानंतर श्रेयस अय्यर भारतासाठी 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. अय्यरने सूर्यकुमार यादवला देखील मागे सोडले आहे. श्रेयस अय्यरने तिन्ही फॉरमॅटमध्ये 1424 धावांचा आकडा गाठला आहे. यावर्षी श्रेयस अय्यरची सरासरी सर्व फॉरमॅटमध्ये 45 पेक्षा जास्त आहे. तर, कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. वन डे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर सरासरी 48 ने खेळत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 30.68 इतकी आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघामध्ये शुबमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, श्रीकर भरत, जयदेव, जयदेव नवदीप सैनी, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!