Share

‘ऋषभ ऑक्शननंतर मला सॉरी म्हणाला..’; आवेश खानचा खुलासा

Published On: 

बंगळुरू : आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. ज्यात काही जण मोठ्या किंमतीत विकले गेले तर काही अनसोल्ड राहिले आहेत. मात्र यात असेही काही खेळाडू होते जे अनेक वर्ष एका संघासोबत खेळले आहेत. त्यांना बजेटमुळे रिटेन करता आले नाही. आणि ऑक्शनमध्ये त्यांच्या किमती इतक्या वाढल्या कि संघाना त्यांना पुन्हा खरेदी करता आले नाही. नुकताच दिल्ली मधून पर्दापण केलेल्या आवेश खानने यासंबंधी खुलासा केला आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपरजाईंट्स या संघाने आवेशला १० कोटीच्या मोठ्या रकमेत खरेदी केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने आवेशला पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला मात्र ते त्याला परत आणू शकण्यास असमर्थ ठरले. याबाबत आवेश म्हणाला “आमची फ्लाइट कोलकात्यात उतरल्यानंतर, मी ऋषभला बाहेर भेटलो आणि त्याने मला मिठी मारण्यासाठी त्याचे हात उघडले. तो मला म्हणाला, ‘सॉरी, ले नहीं पाये’. कारण, त्यांच्याकडे तितके बजेट उरले नव्हते आणि त्यांना अजून खेळाडूही खरेदी करायचे होते. जेव्हा मी नंतर ऑक्शन पाहिला तेव्हा मला दिसले की त्यांनी माझ्यासाठी ८.७५ ची अंतिम बोली लावली होती, परंतु लखनऊने अखेरीस सर्वाधिक बोली लावली.ऋषभसोबत हा खूप भावनिक क्षण होता; आम्ही अंडर-१९ एकत्र खेळलो आहोत, आम्ही नेहमी सामन्यांनंतर एकत्र बसतो, एकत्र हँगआउट करतो,” आवेशने या भावनिक क्षणाचा उल्लेख केला आहे.

आवेशने खेळलेल्या १४ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यावेळी बोलताना सांगितले कि तो प्रशिक्षक रिकी पॉंटिंगलाही मिस करणार असल्याचे सांगितले. ऋषभ वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेत भारतीय संघाचा भाग आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!