मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनी आता त्यांच्यावर टीका तसेच टोलेबाजी करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील टोला लगावला आहे.
विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारची सर्कस झालेली आहे. सर्कसमधील कलाकार कशी भूमिका करत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे आवतनं गावाला आणि वडापाव जेवयला. आमंत्रण जेवणाचे दिले आणि ताटात वडापाव दिले म्हणजे मिर्च्या खा, पाणी प्या आणि उपाशी झोपा अशी सजय राऊतांना पत्रकार परिषद असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्र्यांना हटवण्याची संजय राऊतांना सुपारी मिळाली आहे; नारायण राणेंचा गंभीर आरोप
पातुर्डा शिवारात पुन्हा आढळले अस्वल, शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण
‘नाटकातली घोडी अन् नौटंकी थाट’; आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका
शाकिब अल हसन ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर पत्नीचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

