🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात सध्या दोन विषय सर्वाधिक चर्चेत आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे तथा रश्मी ठाकरे यांचे सख्खे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेली कारवाई आणि त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य. मविआ नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या ईडी कारवायामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याची जास्तच धास्ती घेत मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असे म्हटले. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आव्हाडांवर टीका केली. यावरच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही आता ट्वीट करत पलटवार केला आहे.
“शिवरायांनी धाडसी राजकारण केले शत्रूच्या बायका मुलं मुलिंना छळले नाही. उगाच त्यांचा कारभर आणि त्यांना बदनाम करू नका. तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतीं बद्दल बोलले तेव्हा कुठे होतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शिवरायांनी धाडसी राजकारण केले शत्रू च्या बायका मुलं मुलिंना छळले नाही … उगाच त्यांचा कारभर आणि त्यांना बदनाम करू नका तशी शिकवण जिजाऊंची होती
राज्यपाल जेव्हा छत्रपतीं बद्दल बोलले तेव्हा कुठे होतात @Sadabhau_khot https://t.co/KgCdv8wHA2— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 23, 2022
सदाभाऊ खोत यांचे ट्वीट-
माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठया होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही – जितेंद्र आव्हाड @Awhadspeaks
हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठया होतील.
.
हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का?— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) March 23, 2022
नेमके आव्हाड काय म्हणाले?
राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रवी शास्त्रींची भविष्यवाणी; सांगितले कोण असेल रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन!
- लॉकअपमधून पळून जाण्यासाठी आरोपीने लढवली शक्कल; व्हिडिओ व्हायरल
- साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांना तुरुंगात डांबणे हा ईडीचा सदुपयोग होता का?; भातखळकरांचा शरद पवारांना सवाल
- मिस्ट्री बॉयसोबत दिसली किंग खानची मुलगी सुहाना, फोटोग्राफर्सला पाहताच लपवला चेहरा
- “ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी उभं राहणार” – सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
