मुंबई: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जेव्हापासून टीम इंडिया सोडले, तेव्हापासून ते क्रिकेटपासून थोडे दूर असल्याचे दिसून येत आहे. मात्र क्रिकेटशी संबंधित मुद्द्यांवर ते आपल्या प्रतिक्रिया देत राहतात. नुकतेच रवी शास्त्रींनी आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी नमूद केले की रोहित शर्मानंतर संघाची कमान कोणाच्या हाती असेल, म्हणजेच संघाचा पुढचा कर्णधार कोण होणार?
रवी शास्त्री (ravi shastri) यांनी आगामी काळात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाचा विचार केला आहे. त्यांनी सांगितले, “विराट कोहली आता कर्णधार राहिलेला नाही, पण रोहित शर्मा देखील विशेषत: कसोटीत खूप चांगला कर्णधार आहे. भविष्यात संघाचे नेतृत्व कोण करणार हे भारताला दिसेल. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल सध्या या शर्यतीत आहेत. भारतीय संघ भविष्यासाठी मजबूत कर्णधाराच्या शोधात असेल आणि आयपीएल २०२२ हीच ते पारखण्याची संधी आहे.”
रवी शास्त्रींच्या म्हणण्याप्रमाणे या तिन्ही खेळाडूंना आगामी काळात कर्णधार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पंत, राहुल आणि अय्यरने तिन्ही फॉरमॅटमध्ये गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करून आपले स्थान निर्माण केले आहे. या तिन्ही खेळाडूंवर संघाचा प्रचंड विश्वास आहे. अशा परिस्थितीत यापैकी एक भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. आगामी आयपीएल हंगामात हे तिघेही त्यांच्या संघांचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांना तुरुंगात डांबणे हा ईडीचा सदुपयोग होता का?; भातखळकरांचा शरद पवारांना सवाल
- मिस्ट्री बॉयसोबत दिसली किंग खानची मुलगी सुहाना, फोटोग्राफर्सला पाहताच लपवला चेहरा
- “ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी उभं राहणार” – सुप्रिया सुळे
- IPL 2022 : गंभीरने लखनऊ जायंट्सच्या खेळाडूंना सुनावले; म्हणाला ‘टीम इंडियामध्ये जाण्यासाठी आयपीएल खेळू नका’
- “देश हादरून जाईल अशी प्रकरण…”- संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

