🕒 1 min read
कोल्हापूर : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी ऑनलाइन सभेत संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी महागाईवरून जोरदार हल्ला चढवला.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला होता. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलचं धारेवर धरलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याला आला असल्याने आरोप – प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.
“पंतप्रधान मोदींनी लोकांना रेशन दिलं पण ते शिजवायचं कसं? सिलेंडरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोकांना सिलेंडर घेणंचं परवडत नाही. त्यामुळे आधी कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा का”? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी महागाईवरून केंद्र सरकारला थेट केला.
महत्वाच्या बातम्या –
“युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द का मोडला?”; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल
IPL 2022 KKR vs DC : आपली बॅटिंग भारी आणि फिल्डींग लय भारी..! लॉर्ड ठाकूरनं घेतला रहाणेचा सुपरकॅच
“शिवसैनिक काँग्रेससाठी मतदान करेल”; उद्धव ठाकरे
“बनावट हिंदु हृदयसम्राट लोकांनी झिडकारला”; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला?
“आंदोलकांचा शरद पवारांच्या घरात घुसून इजा पोहचवण्याचा डाव’; आव्हाडांचा खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
