Share

IPL 2022 RR vs KKR : चतुर फिरकीपटू..! युझवेंद्र चहलनं हॅट्ट्रिक घेत पालटला सामना; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध (RR vs KKR) हॅट्ट्रिक (Hat-trick) घेत सर्वांची वाहवा मिळवली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चहलने हा कारनामा केला. चालू हंगामातील ही पहिली हॅट्ट्रिक आहे, आता चहल इंडियन प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारा २१वा गोलंदाज ठरला आहे.

या सामन्यात चहलनेही आपल्या कोट्यातील ४ षटकांत ५ विकेट्स घेतल्या. चहल हा या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला २१८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात १७व्या षटकापर्यंत सामना कोलकाताच्या बाजुने झुकला होता. केकेआरचा कप्तान श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले.

पण १७व्या षटकात युझवेंद्र चहलने संपूर्ण सामना पालटला. चहलने या षटकात कोलकाताच्या ४ फलंदाजांना बाद करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. पहिल्या चेंडूवर त्याने व्यंकटेश अय्यरला बाद केले. चौथ्या चेंडूवर त्याने श्रेयस अय्यरला पायचीत पकडले, पाचव्या चेंडूवर त्याने शिवम मावीला रियान परागकरवी झेलबाद केले आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला यष्टीपाठी झेलबाद करत हॅट्ट्रिक साजरी केली.

आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा चहल हा २१वा गोलंदाज आहे, तर राजस्थान रॉयल्ससाठी हा पराक्रम करणारा तो पाचवा गोलंदाज आहे. युझवेंद्र चहलपूर्वी अजित चंडिला, प्रवीण तांबे, शेन वॉटसन आणि श्रेयस गोपाल यांनी आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी हा करिष्मा केला आहे. या सामन्यात चहलच्या (५/४०) आणि फलंदाज जोस बटलरच्या (१०३ धावा) शानदार शतकाच्या जोरावर राजस्थानने कोलकात्याचा ७ धावांनी पराभव केला. तत्पूर्वी, राजस्थानने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!