मुंबई: IPL 2022 चा ३० वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २१७ धावांचे डोंगर केकेआर पुढे उभे केले. ज्याचा पाठलाग करताना युझवेंद्र चहलच्या शानदार गोलंदाजीने कोलकात्याच्या ७ धावांनी सामना गमावला.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी बटलर सोबत देवदत्त पडिक्कलसोबत सलामीला उतरला . पडिक्कलला (२४) जास्त वेळ मैदानावर राहता आले नाही. कोलकात्याचा फिरकीपटू सुनील नरिनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मात्र बटलरने एकहाती किल्ला लढवत फलंदाजी केली. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या बटलरने ६१ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. ज्यामुळे राजस्थान २१७ पर्यंत पोहचू शकला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1516114211243405313?s=20&t=6-RYWI-jSfbkYE6IwuUNDg
राजस्थानच्या २१८ धावांचा डोंगर सर करण्यासाठी KKRने सुनील नरिनला सलामीला पाठवले. मात्र तो एकही धाव न करता माघारी परतला. ज्यानंतर आरोन फिंच आणि कर्णधार श्रेयस अय्यरने कोलकात्याच्या खेळी सांभाळली. फिंचने ५८ धावांचे अर्धशतक केले तर अय्यरने शानदार ८१ धावांची खेळी केली. मात्र विजयासाठी अवघ्या काही धावा बाकी असताना चहरने (Yuzi chahal) सामन्यात हॅट्रिक आणि ५ विकेट्स पूर्ण करत त्याला बाद केले. या सामन्यात चहरची गोलंदाजी प्रभावी ठरली आहे. कोलकात्याच्या संपूर्ण संघ शेवटच्या षटकात सर्वबाद झाला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 RR vs KKR :सुनील नरिनने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला कोलकाताचा पहिलाच खेळाडू
- IPL 2022 RR vs KKR : जोस द बॉस..! बटलरचा मुंबईत धुमाकूळ; पुन्हा ठोकली सेंच्युरी!
- IPL 2022 : कुठंय बॉल..! गगनचुंबी षटकार ठोकत जोस बटलरचा उमेश यादववर ‘हवाई हल्ला’; पाहा VIDEO
- “सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग ६ पराभवानंतर झहीर खानचे मोठे वक्तव्य; म्हणाला “फक्त एक विजय…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

