🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या १५ व्या हंगामातील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ३४ धावांनी पराभव केला. त्याचवेळी या सामन्याचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हार्दिक पंड्या सामन्यादरम्यान मैदानावर एका इंच टेपने काहीतरी मोजताना दिसत आहे.
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik pandya) सामन्यादरम्यान एक इंच टेप घेऊन मैदानात घुसला. यानंतर हार्दिक मैदानावर काहीतरी मापताना दिसला, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. याचे कारण म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १० व्या षटकात हार्दिक गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यानंतर तो थोडा गोंधळलेला दिसला. हार्दिक त्याच्या गोलंदाजीच्या गुणांबद्दल गोंधळलेला होता आणि सामान्य रन अप कुठून घ्यायच्या हे समजत त्याला समजत नव्हते.
हार्दिक खूप मार्क्स करून थकला आणि मग त्याने रनअप मोजण्यासाठी डगआऊटकडे बोट दाखवलं. त्यानंतर हार्दिक जमिनीचे मोजमाप करण्यासाठी डगआउटमधून एक इंच टेप आणताना दिसला. हार्दिकने इंच टेपने फील्ड मोजण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने असे आधीही केले आहे. यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे फलंदाज हे दृश्य पाहत होते. नंतर, गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफचा एक सदस्य इंच टेप घेऊन मैदानावर येताना दिसला, ज्यामुळे हार्दिकला रनअप मोजण्यात मदत झाली. हार्दिकची ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- जेएनयूच्या गेटवर झेंडे, पोस्टर्सवर लिहले भगवा जेएनयू
- दिशा सालियन ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना दिलासा कसा मिळतो?; संजय राऊतांचा सवाल
- IPL 2022 RR vs GT: कॅप्टन्स इनिंग खेळणाऱ्या हार्दिकचे एक तिर में दोन निशाणे; सामना तर जिंकला सोबतच…
- “…नंतर येत आहे ‘टॉयलेट एक लव्ह स्टोरी’”; संजय राऊतांचा ट्वीट करत इशारा
- IPL 2022 RR vs GT: अन् सामना सुरु असताना ‘या’ कारणामुळे हार्दिक मैदानाबाहेर पडला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
